Ad will apear here
Next
होमो डेअस भाग - ११

    आपला मूळ प्रश्न होता ' इतर प्राण्यांना मन असतं की नाही ?आपण त्या गोष्टीचे आपल्याशी भावनिक नाते संबंध जोडले जाऊ शकतील का ही क्षमता पाहत असतो . जेव्हा एखादा प्राणी अत्यंत गुंतागुंतीची भावना असणारं वर्तन करतो तेव्हा आपल्याला हा एक अत्यंत प्रगल्भ पण संवेदनाहीन अल्गोरिदम आहे असं सिद्ध करून दाखवता येणार नाही .माणूस करत असणारी प्रत्येक गोष्ट 'ज्यामध्ये आपण जाणीव असणारी अवस्था असे म्हणतो , तीसुद्धा अल्गोरिदमने बजावलेली जाणीव रहित कामगिरी असू शकते . 

       माणसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा एखादा माणूस आपल्याला जाणीव आहे असे म्हणतो , तेव्हा आपण त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो . किमान गृहीतकांवर विसंबून आपण जाणिवेबाबतच्या मेंदूतल्या लहरी ओळखतो .त्यावरून माणसांमध्ये असणारी जाणिवेची अवस्था किंवा जाणीव रहित अवस्था पद्धतशीरपणे ओळखता येते . जाणीव जागृत करण्यासाठी मेंदूतल्या चेतापेशीची  विशिष्ट क्षमता केवळ माणसातच नव्हे तर सर्व सस्तन प्राणी पक्षी आणि ऑक्टोपस सारख्या अन्य काही प्राण्यांच्याही मेंदूत असते थोडक्यात अन्य प्राण्यांमध्ये जाणीव असते .   

      भूतकाळातल्या किंवा भविष्यकाळातल्या प्रसंगाची जाणीव असण्यासाठी भाषेची गरज काय आहे हे मानवाला अद्याप पुरेशी स्पष्ट झालेलं नाही . माणूस  आपलं प्रेम किंवा भीती दाखवण्यासाठी भाषेचा वापर करतो .अन्य प्राणी मात्र प्रेम आणि भीती व्यक्त करण्यासाठी शब्द रहित माध्यमांचा वापर करत असतात . खरंतर माणसाला सुद्धा भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या गोष्टींची जाणीव शब्दात न मांडताही होत असते .आपणास जेव्हा स्वप्न पडते  तेव्हा आपण त्यातल्या सगळ्या निशब्द गोष्टींची आपणाला जाणीव असते . जागं झाल्यावर आपण त्या शब्दांमध्ये मांडत असतो . आपल्याला जोपर्यंत एखाद्या अल्गोरिदम साठी जाणिवेची गरज आहे हे ठाऊक नाही तोपर्यंत जाणीवपूर्वक असलेली स्मृती आणि योजना न वापरता कुठल्याही प्राण्यांना केलेलं वर्तन हे त्याच्यामध्ये जाणीवे खेरीजच्या अल्गोरिदम मुळे होतो असं आपण म्हणू शकतो .        

        आपण जेव्हा एखाद्या भिकाऱ्याला पैसे दान करतो तेव्हा त्या भिकाऱ्याला बघून होणाऱ्या अप्रिय भावनेला आपण प्रतिसाद देत नसतो का ? आपल्याला खरोखरच त्या भिकार याबद्दल काळजी वाटत असते की स्वतःला बरं वाटून घ्यायचं असतं . ? माणसाने प्राणी केवळ आपली एक केसाळ आवृत्ती आहेत असं समजून मानवी भावभावना लादता कामा नयेत . केवळ विज्ञानाच्या दृष्टीनेही हे चूक आहे असं नव्हे तर त्यामुळे आपल्याला प्राणी कसे आहेत हे समजून घेण्यात आणि त्यांना योग्य ती किंमत देण्यात ही अडचण येते .आपण प्राण्यांना मानवी गुणधर्म लावून त्यांच्या आकलनाच्या क्षमता कमी लेखत त्यांच्या अनोख्या क्षमते कडे दुर्लक्ष करत असतो .        
    असं जर असेल तर प्राणी एवढे हुशार असूनही मानव एवढा श्रेष्ठ कशामुळे ठरतो  ? तर माणसाकडे आत्मा 'जाणीव यासारखी विशेष महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित केली तरीसुद्धा आपण वास्तवतेच्या पातळीवर येत आपल्याकडे कोणत्या शारीरिक व मानसिक क्षमता आहेत या पाहायला हव्यात . हत्यारांची निर्मिती करता येणे आणि बुद्धीमत्ता या गोष्टीमुळे मानव जातीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असं अभ्यासकांचं म्हणणं आहे . 

    आपण जगावर स्वामित्व गाजवण्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अनेक माणसांना परस्परांशी साधता येणारा संवाद . मानव आज या ग्रहावर संपूर्णतः स्वामित्व गाजवतो आहे याचं कारण -एक एकटा माणूस  चिंपाझी किंवा लांडग्यापेक्षा खूप हुशार आणि चलाख आहे असं नसून मानव जात ही पृथ्वीवरची एकमेव प्रजाती आहे ' जी एकमेकांना सहकार्य करू शकते . बुद्धिमत्ता आणि हत्यारे बनवण्याची क्षमता या गोष्टी अर्थातच अत्यंत महत्त्वाच्या आहेतच . पण माणसांनी लवचिकपणे एकमेकांना सहकार्य केलं नसतं तर आपल्या हुशार मेंदूला आणि कुशल हातांना युरेनियमच्या अणूचं विभाजन करण्या ऐवजी दगड फोडत बसायला लागलं असतं . 

    आज आपल्याला असलेल्या ज्ञानानुसार केवळ सेपियन्स हीच प्रजाती अनोळखी व्यक्तींना असंख्य प्रकारे अतिशय लवचिकपणे सहकार्य करू शकते . चिरंतन आत्मा किंवा कुठल्या अनोख्या प्रकारच्या जाणीवेचा भाग यापेक्षाही ही महत्त्वाची क्षमता आपण या ग्रहावर का राज्य करतो याचं स्पष्टीकरण देणारी आहे .        

 इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर एकमेकांना केलेल्या सहकार्याचे महत्त्व दर्शवणारे अनेक पुरावे सापडतात .ज्यांनी परस्परांना चांगल्याप्रकारे सहकार्य केलं त्यांच्या बाजूला नेहमीच विजयश्री झुकते.आपण कोणीतरी स्पेशल आहोत आणि आपल्याला सारे हक्क प्राधान्याने मिळाले पाहिजेत 'असा विचार करण्याकडे आपला कल असतो . आपण इजिप्तमध्ये मोठे पिरॅमिड बांधले 'आणि चीनची भिंत बांधली . आपण अणूची आणि डीएनएच्या रेणूची रचना उलगडून दाखवली .आपण दक्षिण ध्रुवावर आणि चंद्रावर देखील पोहोचलो . जर या सार्‍या गोष्टी प्रत्येक माणसात असणाऱ्या एका खास मुलं तत्त्वामुळे घडत असतील तर मानवी जीवन पवित्र आहे असे म्हणण्याला काहीतरी अर्थ होता . मात्र या सार्‍या गोष्टी एकमेकांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्यामुळे साध्य झाल्या असल्याने आपण व्यक्तिगत मानवा बाबत कितपत आदर दाखवायचा हे पुरेसं स्पष्ट होत नाही माणूस चिंपाजी पेक्षा खूप अधिक चांगल्या प्रकारे परस्पर सहकार्य करू शकतो . त्यामुळेच तर माणूस चंद्रावर अंतराळयान पाठवू शकला आणि चिंपाझी मात्र प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या प्रेक्षकांकडे दगड फेकत राहिले .       
      याचा अर्थ माणूस हा अधिक श्रेष्ठ प्राणी आहे असाच होतो असं लेखक या ठिकाणी निर्देशित करतो .एकदा माणूस अशा प्रचंड आणि गुंतागुंतीच्या सामाजिक यंत्रणा कशा उभारू शकला असेल ? संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार असं दिसून येतं की सेपियन्स दीडशे व्यक्तींपेक्षा जास्त लोकांशी जवळचे नाते संबंध मग ते शत्रुत्वाचे असोत की मित्रत्वाचे असोत ठेवू शकत नाही .मोठ्या प्रमाणावर परस्पर सहकार्याचे जाळं उभारण्याची माणसांची क्षमता ही जवळच्या नाते संबंधावर अवलंबून नाही .शास्त्रज्ञ करत असलेले प्रयोग एकेकट्या व्यक्तीवर किंवा फार तर सहभागी झालेल्या लोकांच्या छोट्या गटांवर करतात . त्यामुळे छोट्या गटांवर केलेल्या प्रयोगातून समाजातला मोठा गट कशा प्रकारे वर्तन करत असेल याचे निष्कर्ष काढणं धोक्याचं आहे .शंभर लोकांचा गट ज्याप्रमाणे वर्तन करेल त्यापेक्षा दहा कोटी लोकांचा देश अगदी वेगळ्या प्रकारचं वर्तन करेल .     

         लेखकाने एक सुंदर अल्टिमेटम गेम्सचं उदाहरण दिलं आहे .हा प्रयोग सहसा दोन लोकांवर करतात .यापैकी एकाला 100 रु दिले जातात . ही रक्कम त्यांना दोघात हव्या त्या प्रमाणात वाटून घ्यायची असते . तो सगळी रक्कम स्वतः जवळ ठेवू शकतो . निम्मी निम्मी वाटून घेऊ शकतो . किंवा यापैकी मोठा भाग दुसऱ्याला देऊ शकतो . दुसरा खेळाडू मात्र दोन पैकी एक गोष्ट करू शकतो .जी विभागणी केली आहे ती स्विकारण किंवा ती पूर्णतः नाकारण  .जर त्याने ही विभागणी नाकारली तर दोघांनाही काहीच मिळत नाही .

       अभिजात आर्थिक सिद्धांतानुसार माणूस हा विवेकी आणि हिशोबी यंत्र आहे .त्यांच्या मतानुसार बहुसंख्य लोक स्वतःकडे $99 ठेवतील आणि दुसऱ्या सहभागी झालेल्या व्यक्तीला एक डॉलर देईल . दुसरी व्यक्ती ही रक्कम स्वीकारील . थोडाफार विवेक असणारी व्यक्ती असा फुकट मिळालेल्या $1 स्वीकारायला नकार देणार नाही .अल्टीमेटम गेम मध्ये भाग घेणारे बहुसंख्य खेळाडू अगदी कमी रक्कम नाकारतात कारण त्या रकमा अन्याय्य असतात .आपण बावळट आहोत हे दाखवण्यापेक्षा ते हरणं पसंत करतात .आणि वास्तवातल  जगही असंच चालत असतं . अगदी थोडे लोक आपल्या जोडीदाराला अत्यंत कमी वाटा देऊ करतात बहुसंख्य लोक हे पैसे समान वाटून घेतात किंवा स्वतःकडे थोडा जास्त फायदा ठेवतात .आणि दुसर्‍या खेळाडुला तीस-चाळीस देऊ करतात .

          थोडक्यात काय तर मानवजात ही केवळ थंड गणिती तर्कानुसार चालत नाही तर ते उबदार सामाजिक तर्क शास्त्रानुसार वागत असतात . भावना आपल्या वर्तनावर वर्चस्व गाजवत असतात .आपण अन्याय्य गोष्टी नाकारतो कारण अश्मयुगात ज्या लोकांनी अशा अन्याय गोष्टी स्वीकारल्या त्यांचा निभाव लागू शकला नाही. अत्यंत मोठ्या प्रमाणावर चालणारं मानवी सहकार्य हे अंतिमतः आपल्या विश्वासावर आधारलेलं असतं . हे नियम जरी आपल्या कल्पनेतली असले तरी ते आपण गुरुत्वाकर्षणाइतकेच खरे आणि मोडता न येण्यासारखे मानत असतो .      

      वास्तव हे तीन प्रकारचे असतं .आहे हेच खरं वास्तव आणि वस्तुनिष्ठ वास्तव.आपल्या डोक्यात कोणताही विश्वास असो किंवा भावना असो वस्तुनिष्ठ सत्यता त्यावर अवलंबून नसते .उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण ही वस्तुनिष्ठ सत्यता आहे . न्यूटनच्या आधीपासूनही ती अस्तित्वात होती आणि ज्या लोकांचा गुरुत्वाकर्षणावर विश्वास नाही त्यांच्यासाठी आणि विश्वास असणाऱ्यांसाठी सारख्याच प्रकारे आपलं काम ती करत असते . याउलट वैचारिक पातळीवर असणारं वास्तव  प्रत्येकाच्या वैयक्तिक विश्वासावर आणि भावनांवर अवलंबून असतं .बहुसंख्य लोकांना वास्तव हे एकतर वस्तुनिष्ठ वाटतं , किंवा व्यक्तिगत .याला कुठला तिसरा पर्याय नाही असं त्यांना वाटत असतं . परमेश्वर पैसा आणि राष्ट्र या गोष्टी खरंतर वस्तुनिष्ठ वास्तव असल्या पाहिजेत . मात्र एक तिसऱ्या पातळीवरचं वास्तवही असते त्याला समुदाय निष्ठ वास्तव म्हणता येईल . समुदायनिष्ठ  गोष्टी एक एकट्या माणसाच्या विश्वास आणि भावनांवर अवलंबून नसून त्या अनेक जणात ल्या परस्पर संवादावर अवलंबून असतात . 
.
       इतिहासातल्या बहुसंख्य महत्त्वाच्या गोष्टी अशा समुदायनिष्ठ आहेत .उदाहरणार्थ पैशाला कोणतच वस्तुनिष्ठ मूल्य नाही . तुम्ही डॉलरची नोट खाऊ शकत नाही ' पिऊ शकत नाही ' किंवा अंग झाकायला वापरू शकत नाही . तरीसुद्धा अब्जावधी लोक त्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवतात .आपण अन्न आणि कपडे खरेदी करायला ती वापरू शकतो . डॉलरचे मूल्य जर नष्ट होईल अर्थात हे कागदाचे तुकडे अस्तित्वात राहतीलच .पण त्यांची किंमत मात्र काहीच असणार नाही . माणलेल्या मूल्यावरचा विश्वास उडून जाणे हे केवळ पैशाबाबत घडतं असं नाही . देवा बाबत आणि संपूर्ण साम्राज्या बाबत हे घडू शकतं .  एकाक्षणी या साऱ्यांमुळे जगाला आकार येत असतो तर पुढच्या क्षणी त्यांचं अस्तित्व संपलेलअसतं .         

        पैसा ही गोष्ट समुदाय निष्ठ असते म्हणून स्वीकारायला तुलनेने सोपी आहे .आपला देव ' आपलं राष्ट्र किंवा आपली मूल्ये ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे हे मान्य करण्याची मात्र आपली तयारी नसते . अखेर या सार्‍या गोष्टी आपल्या आयुष्याला अर्थ देत असतात . आपल्या आयुष्याला काहीतरी वस्तुनिष्ठ अर्थ आहे आणि आपण त्याचा त्याग करतो त्याचं काहीतरी केवळ कल्पनेपलीकडे मोठं महत्त्व आहे असं आपल्याला वाटत असत .प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य लोकांच्या आयुष्याला अर्थ येतो त्यांनी एकत्रित विश्वास ठेवलेल्या 'मानलेल्या कथांच्या जाळ्यातून . अनेक लोक जेव्हा समान गोष्टींची जाळी वि णतात तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो . समाज मान्यतेने केलेले लग्न , र मजानच्या वेळी उपवास करणं 'निवडणुकीच्या दिवशी मत देणे 'अर्थपूर्ण का वाटतं -याचं कारण ती कृती माझ्या आई-बाबांना अर्थपूर्ण आहे असं वाटतं माझ्या भावांना ' शेजार्‍यांना ' आसपासच्या शहरातल्या माणसांना ,आणि दूरदूरच्या देशातल्या नागरिकांनाही ती अर्थपूर्ण आहे असं वाटत असतं . कारण त्यांचे मित्र आणि शेजारी हा समान दृष्टीकोन बाळगून असतात . 

         लोक एकमेकांच्या विश्वासाला चक्राकार पद्धतीने सतत पाणी घालत असतात .एकेकाळी माणसांच्या आयुष्यात असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांच्या वंशजांनाकरता पूर्णतः निरर्थक असते हे यामधून आपणाला जाणून घेता येत .       
         इतिहास अशा प्रकारे उलगडत जातो . लोक तत्कालीन अर्धाच एक जाळं तयार करतात .अगदी मनापासून त्यावर विश्वास ठेवतात . पण आज ना उद्या तेजाळ विस विशीत होत' आणि जेव्हा आपण मागं वळून पाहतो तेव्हा त्या वेळी लोकांनी याला गंभीरपणे कसं घेतलं हेच आपल्याला समजत नाही .

.      आज मागे वळून पाहताना स्वर्गात जाण्याच्या भीषण . धर्मयुद्धात सहभागी होणं हा निव्वळ मूर्खपणा वाटतो .आता मागे वळून पाहिलं तर शीतयुद्ध सुद्धा अगदी मूर्खपणाच वाटतं . केवळ तीस वर्षांपूर्वी लोक अणू युद्धात सगळं जग बेचिराख करायला कसं काय निघाले होते याचे नवल वाटते .  यापुढे शंभर वर्षांनी आपल्या वंशजांना आपला लोकशाही आणि मानवी हक्कांवर असणारा विश्वास तितकाच अनाकलनीय वाटेल .      
  
       मानव  अर्थाचं समुदायनिष्ठ जाळं विणत असल्यामुळे ते जगावर राज्य करू शकतात . कायदा सैन्य ' वेगवेगळ्या संस्था आणि ठिकाणं यांचं जाळं सर्वांच्या सामायिक कल्पनेमध्ये तयार झालेलं असतं . या जाळ्यामुळे केवळ माणूस धर्मयुद्ध ' समाजवादी क्रांती आणि मानवी हक्काविषयी चळवळी उभारू शकतो . अन्य कुठलाही प्राणी आपल्या मार्गात आडवा येऊ शकणार नाही .त्यांना आत्मा नाही किंवा मन नाही म्हणून नव्हे तर त्यांच्याकडे पुरेशी कल्पनाशक्ती नाही म्हणून .सिंह धावू शकतो , उड्या मारू शकतो 'आपल्या पंज्यानं फटका करू शकतो किंवा चावू देखील शकतो . मात्र त्याला कधीच बँक अकाउंट उघडता येणार नाही किंवा कुणावर खटला दाखल करता येणार नाही . 
              अशा समुदायनिष्ठ गोष्टी तयार करण्याच्या क्षमतेमुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा झाला आहे .काहींचा तर विश्वास आहे की आपण जनुकाचा कोडं उलगडलं आणि मेंदूतल्या प्रत्येक चेतापेशीचा नकाशा तयार केला तर आपल्याला मानव जातीची सारी रहस्य उलगडतील .     
       थोडक्यात एकविसाव्या शतकामध्ये इतिहास आणि जीवशास्त्र या मधल्या सीमारेषा अधिक धुसर होतील .आपल्याला ऐतिहासिक घटनांची जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देता येतील म्हणून नव्हे तर आपल्या आदर्शा मागच्या कहाण्या मुळे आपला डीएनए बदलेल .राजकीय आणि आर्थिक बाबतीतील घटनांमुळे पर्यावरणामध्ये बदल घडेल . डोंगर आणि नद्यांनी बनलेल्या भूगोलाची जागा सायबर स्पेस ऑनलाइन जगत घेईल . माणसाच्या डोक्यातल्या काल्पनिक गोष्टी जनुकीय आणि इलेक्ट्रॉनिक कोडमध्ये बदलत जातील ,तसतसे समुदायनिष्ठवास्तव वस्तुनिष्ठ वास्तवाची जागा घेईल .आणि जीवशास्त्र इतिहासामध्ये विलीन होईल . 

       एकविसाव्या शतकामध्ये काल्पनिक गोष्टी पृथ्वीतलावरच्या सर्वात सक्षम शक्ती बनेल . त्यामुळे आपल्याला भविष्य समजून घ्यायचं असेल तर जिमोन्सचा अर्थ लावून आणि आकड्यांवर प्रक्रिया करणं पुरेसं नाही . आपल्याला जगाला वेगळा अर्थ दर्शवणाऱ्या काल्पनिक कहाण्या मागचं गुढदेखील उकलून पाहिलं पाहिजे . 
        कमश :
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYIQCO
Similar Posts
होमो डेअस - भाग ३ युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय
होमो डेअस - भाग १० युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय
होमो डेअस भाग -८ होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय लेखक युआल नोआ हरारी
युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा परिचय - भाग १ युवाल नोआ हरारी सेपियन्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक यांच्या होमो डेअस मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध अनुवाद सुश्रुत कुलकर्णी मधुष्री पब्लिकेशन या पुस्तकाचा तीस भागांतून करून दिलेला सारांशाने परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language